जामनेर (प्रतिनिधी ) – समाज जीवनामध्ये कुटुंब व कुटुंब व्यवस्था टिकवणे हा समाजाचा मूलभूत पाया आहे. आज कुटुंब टिकलं तर समाज टिकेल आणि समाज टिकला तर ‘राष्ट्र’ टिकेल या सर्व बाबींचा विचार करता देवगिरी प्रांत विद्याभारती संलग्नित, लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल जामनेर या शाळेने आजी-आजोबा दिवस साजरा केला.
आपणं रक्षाबंधन, भाऊबीज, मातृ-पितृ दिन साजरा करत असतो.परंतु आपल्या कुटुंब व्यवस्थेतील मूळ पाया घरातील जेष्ठ मंडळी असते. यांचा बालवयातील मुलांच्या सोबतं अधिक जवळचे नाते असते हे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी आज या जेष्ठ मंडळींचा सन्मान करण्यासाठी “आजी-आजोबा सन्मान दिनाची” योजना करण्यात आली.
आज शाळेत आजी-आजोबांनी नातवंडांना वेगवेगळ्या खेळात सहकार्य केले व स्वतःहा सहभागी झाले.त्यामध्ये कागदी ग्लासपासून इमारत बनवणे, स्ट्रॉ-ग्लास पासून खेळ,आध्यात्मिक विषयांत रुची वाढवणारे खेळ आदी.कार्यक्रमात सर्वाचा सहभाग उत्तम राहिला. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला . शाळेच्या प्राचार्य सौ.केतकी राहुल चव्हाण यांनी सर्व आजी-आजोबा यांचे आभार मानले व शाळेतील शिक्षिका सौ.दिपाली येणे यांनी सूत्रसंचालन केले.