नशिराबाद (प्रतिनिधी) एलग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला सात महिन्यांची गर्भवती केल्याप्रकरणी एकावर नशिराबाद पोलीस सत्शनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित युवतीच्या वडिलांनी १२ रोजी नशिराबाद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी विशाल तानाजी पवार याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.