शेरशाह ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
मुंबई (वृत्तसंस्था ) – फिल्मफेअर 2022 च्या पुरस्कारांची घोषणा झाली असून अभिनेता रणवीर सिंग याला 83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मिमी या चित्रपटासाठी कृती सॅननने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
तसेच कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावरील शेरशाह या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
क्रिटीक चॉईसचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सरकार उधमसाठी विकी कौशलला मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार शेरणीसाठी विद्या बालनला मिळाला आहे. तर क्रिटीक चॉईसनुसार सरदार उधम हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सई ताम्हणकर
सर्वोत्कृष्ट कथा – अभिषेक कपूर, सुप्रतिक सेन, तुषार परांजपे (चंदिगढ कारे आशिकी)
सर्वोत्कृष्ट डायलॉग – दिबाकर बॅनर्जी, वरुण ग्रोव्हर (संदीप और पिंकी फरार)
सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले – शुभेंदू भट्टाचार्य आणि रितेश शहा (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथा – चंदिगढ कारे आशिकी
सर्वोत्कृष्ट पदार्पण – इहान भट (99 साँग्ज)
सर्वोत्कृष्ट पदार्पण – शर्वरी वाघ (बंटी और बबली 2)