जिल्ह्यातील खुनसत्र सुरूच
चाळीसगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खून सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. चाळीसगाव तालुक्यातील अभोणे गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून केला अशी माहिती मिळाली आहे. ही घटना दि.२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
चाळीसगाव तालुक्यातील अभोणे येथे बैल सणाच्या उत्साह सुरू होता. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (३८) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (३२) हे घरी बैल पूजनासाठी आले. तितक्यात त्यांच्यामध्ये किरकोळ वाद होऊन वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले. दारापुढे बैल पूजनाची तयारी सुरू असताना हा वाद सुरू होता, जवळच बैल पूजनासाठी लोखंडी काठी ठेवण्यात आली होती, मोठा भाऊ पिंटू तीच काठी घेऊन, लहान भाऊ शिवाजी यांच्या डोक्यावर तीन वार केले, डोक्यावर जोरदार प्रहार झाल्यामुळे पिंटू जागीच गतप्राण झाले.
त्याला तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जिल्ह्यात पाच महिन्यानंतर ही १४ वि घटना घडत असून जिल्हा पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.