जळगाव ( प्रतिनिधी ) – जगातील अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये केले जाते . या रुग्णालयाची ऑर्थोपेडिक ओ.पी.डी. आणि आयपीडी आता जळगावमध्ये सुरु होत आहे. लोकमान्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. समीर देशमुख रुग्णांची तपासणी करणार आहेत.
गुडघेदुखी, खुब्याचे दुखणे, मणक्याचे आजार, तसेच इतर सांध्याच्या विकारांवर तपासणी आणि उपचार जळगावातच होणार असल्याने आता रुग्णांचा मुंबई , पुण्याला जाण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे . दुर्बिणीद्वारे सर्व सांध्यातले लिगामेंट आणि कार्टीलेज आणि गादीचे ऑपरेशन केले जाणार आहेत. गुडघे, खुबा, खांदा, आणि एलबोचे जॉईंट रिप्लेसमेंट अत्याधुनिक रोबोटिक्स पद्धतीने करण्यात येते. मणके दुखी, पाठदुखी, कंबर दुखी, स्लिप डिस्क- गादी सरकणे यावरिल दुर्बिणीद्वारे उपचार उपलब्ध होणार आहेत.
२७ ऑगस्ट २०२२ रोजी शनिवारी डॉ. समीर देशमुख अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळा जवळ, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत रुग्णांची तपासणी करणार आहेत. तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी रुग्णांनी 9673859185 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.