पाचोरा (प्रतिनिधी ) – स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आशीर्वाद दिला, त्यांना तिकिटे देऊन निवडून आणले त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल पाचोरा येथे शिवसंवाद सभेत केली . यावेळी त्यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका केली.
यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
यावेळी शिवसेना नेते आदेश बांदेकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी आमदार स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पत्नी श्रीमती कमलताई पाटील, तालुक्याची शिवसेनेची धुरा हाती घेतलेल्या निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी, विधानसभा संपर्कप्रमुख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख रमेश बाफना, शरद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, कांताबाई मराठे, मुंबई येथील नगरसेविका अंजली नाईक, भडगाव येथील माजी उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, मनोहर चौधरी, आबा कासार, परशुराम पाटील, पंकज पाटील, चेतन भोई, दत्ता जडे, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे, धर्मेंद्र चौधरी, गणेश शिंदे व्यासपीठावर होते.