नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना स्वगृही जाण्याची सशर्त परवानगी गृहमंत्रालयाने दिली आहे. यानुसार हैद्राबाद ते झारखंड या मार्गावर आज सकाळी पहिली ट्रेन धावली. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारनेही महाराष्ट्रातून रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. बिहारमधील मंत्री संजय झा यांनी म्हंटले कि, स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या राज्यामध्ये अडकून पडले आहेत. आम्ही केंद्राकडे विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी केली आहे. बसमधून या लोकांना आणण्याचा विचार केल्यास रेल्वेच्या केवळ एक एक तृतीयांश लोकांइतकीच बसची क्षमता असते. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर अनेक ठिकाणी बिहारमधील लोक अडकून पडली आहेत. त्यांना सुरक्षित परत आणणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे.