रावेर (प्रतिनिधी ) – एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी रावेर शहरातील स्टेशन रोडवरील ग्रामीण रुग्णालयाजवळ उघडकीस आली. असून यामुळे शहरात खळबळ उडाली असून आत्महत्या करणारा व्यक्ती हा निवस्त्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत वृत्त असे रावेर शहरात स्टेशन रोड वर ग्रामीण रुग्णालयाजवळ अतिक्रमण असलेल्या गॅरेज दुकानाच्या पत्राच्या शेडमध्ये रात्री अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.