जळगाव (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षाचे झेंडावंदन करण्याचा मान यंदा कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना मिळाला आहे. याबाबतचे परिपत्रक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगडानी यांनी नुकतेच काढले आहे. तर जिल्ह्यातील दुसरे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक येथे ध्वजारोहण केले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगडानी यांनी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री वाटप झालेले नसल्यामुळे ज्या आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्या सर्व १८ मंत्र्यांना तसेच उपमुख्यमंत्र्यांना ध्वजारोहणासाठी जिल्हे दिलेले आहेत. त्याबाबतची यादी जाहीर केली आहे यामध्ये १९ जिल्ह्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्री तर इतर १६ जिल्ह्यांपैकी अमरावती सोडून सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. अमरावती येथे विभागीय आयुक्त ध्वजारोहण करणार आहेत.
खान्देशात धुळे येथे शासकीय ध्वजारोहण दादा भुसे यांच्या हस्ते तर नंदुरबार येथे शासकीय ध्वजारोहण विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे.