जळगाव (प्रतिनिधी) – येथील इच्छादेवी चौकात राहणाऱ्या तरुणाचा मेहरुण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेतली असून अकस्मात मृत्यू नोंद करण्याचे काम सुरू होते.
नाना सुरेश सोनवणे (वय ३२, रा.इच्छादेवी नगर ) हा तरुण सकाळी १२ वाजेच्या सुमारास मेहरण तलाव येथे गेला होता. काही वेळानंतर तो तेथे बुडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. त्या ठिकाणी सिएमओ डॉ.प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांची गर्दी होती. कुटुंबीयांनी मन हे लावणारा आक्रोश केला.
मयत नाना सोनवणे यास आई, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो लक्झरी बस स्टॉप वर वाहकाचे काम करत होता. त्याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे.