जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या एका विस वर्षीय तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान गफार खान (वय-२०) रा. पोलिस कॉलनी सुप्रीम कॉलनी, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. गुरूवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री जेवण करून झोपला. मध्यरात्री त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. दरम्यान शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी करीत आहे.