जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नेहरू चौक येथील रत्ना अपार्टमेंटच्या पार्किंग झोन मधून मध्यरात्री वृध्दाची विस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र श्रीधर भडगावकर (वय-६७) रा. रत्ना अपार्टमेंट, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. ते सराफाचा व्यवसाय करून आपला उपजीविका चालवीतात. मंगळवारी २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग झोन मध्ये त्यांची मोटरसायकल (एमएच १९ एम ५८९०) ही पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली २० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरून नेली. बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मोटरसायकल चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. रवींद्र भडगावकर यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.