मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशात ३ तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील याच वातावरणात आज महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण; #महाराष्ट्रदिन साधेपणाने साजरा.ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून केले अभिवादन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणकरण्यात आला. मंत्रालयातही महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.