जळगाव (प्रतिनिधी) – तरसोद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हरीओम धनाजी पाटील (वय – ३८) रा. नायडोंगरी, ता. चाळीसगाव ह.मु. श्रध्दा कॉलनी, गोदावरी चक्कीजवळ जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. हरीओम पाटील हा आईवडीलांसह वास्तव्याला आहे. बांधकामाचे साहित्य पुरविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. हरीओम पाटील हा गुरूवार २८ जुलै रेाजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त जळगावहून नशिराबाद कडे दुचाकीने जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हरीओमचा जागीच मृत्यू झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होती. नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शुक्रवारी २९ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई दगूबाई, वडील धनाजी गंधार पाटील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.