जयपूर ;- देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. कोटा – राजस्थानमधील काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून राज्यातील दारुची दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती आणि दारुपासून मिळणाऱ्या कराची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. विशेष म्हणजे, सरकारने खुलेपणाने दारुविक्रीला परवानगी नाकारली आहे. मात्र, अवैधपणे दारुविक्री जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे काही जणांचा हा लॉकडाऊन काळात स्वयंरोजगार झाल्याचे राजस्थानच्या कोटा येथील सांगोद मतदारसंघाचे आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी म्हटलंय. यासोबत, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीकडेही त्यांनी लक्ष वेधलंय.
देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, देशातील विविध राज्यात राजकीय पक्षातील नेते आणि काही नामवंत व्यक्तींकडून दारु सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात दारुची दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. ”राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान ‘वाईन शॉप्स’ सुरु करून राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे,” अशी सूचना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. राज ठाकरेंच्या या सूचनांवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अवैध दारुविक्री सुरु असल्याचे मान्य केले होते.
राज्याला पैशांची गरज आहे हे 100 टक्के आहे. त्यात काहीच शंका नाही. या परिस्थितीमध्ये महसूल कसा उभा करायचा याचा विचार करावा लागेल. दारू बंद केल्यानं दारू बंद आहे असं नाही. कारण काळाबाजार सुरु झालेला दिसतो, थोरातांनी सांगितलं होतं.