जळगाव ( प्रतिनिधी ) – यशवंत नगरातून टाटा सुमो कार घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली रामानंद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली
सुनिल लक्ष्मण इंगळे (वय-५२) हे यशवंत नगर येथे परिवारासह राहतात. नोकरी करतात. शासकीय नोकरीच्या ठिकाणी त्यांनी त्यांची टाटा सुमो गोल्ड वाहन क्रमांक (एमएच ४६ एएक्स १३५१) त्यांच्या घरासमोर १३ जुलै रोजी सायकाळी लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २ लाख २५ हजार रूपये किंमतीचे हे वाहन चोरून नेल्याचे १४ जुलै रोजी उघडकीला आले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतू वाहन कुठेही मिळाले नाही. अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना जितेंद्र तावडे करीत आहेत.