भुसावळ ( प्रतिनिधी ) – रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅग आढळल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाने काही परिसर सील केला होता.
भुसावळ रेल्वे स्टेशनवर १४ जुलै रोजी रात्री बेवारस बॅग आढळून आली. बॅग पोलीस पथकाने आणि बॉम्ब पथकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्मनुष्य ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये टाकून रेल्वे मैदानात नेली बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. मात्र बॅगमध्ये काहीही संशयस्पद वस्तू मिळून आलेली नाही ,त्यामुळे एक तास सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनने सुटकेचा श्वास घेतला. संबंधित व्यक्तीने ठेवलेल्या बॅगबाबत त्या व्यक्तीचा शोध घेतल्या जाईल आणि कारवाई केली जाईल पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.