जळगाव ( प्रतिनिधी ) – कोल्हेनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा हुंड्यांसाठी मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला
कोल्हेनगर येथील सुनयना विवेक बोंडे ( वय २७ ) यांचा नाशिक जिल्ह्यातील कामतवाडे येथील विवेक नथ्थु बोंडे यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नानंतर पतीसह सासू व सासरे यांनी सुनयना हिस हुंड्याच्या पैशांची मागणी केली. यावरुन सुनयना हिस वेळावेळी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने सुनयना माहेरी निघून आल्या. त्यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. मंगळवारी सुनयना हिचे पती विवेक बोंडे, सासू विजया बोंडे, सासरे नथ्थु बोंडे, ( तिघे रा. वावरेनगर, कामतवाडे, नाशिक ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास महिला पो हे कॉ उषा सोनवणे करीत आहेत.