जळगाव ( प्रतिनिधी ) – खूनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगताना नाशिकच्या कारागृहातून कोरोनामुळे तात्पुरती रजा मिळाल्यावर फरार झालेल्या कैदी महिलेला टोणगाव ( ता. भडगाव ) येथून ११ जुलैरोजी सकाळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
खूनाच्या गुन्ह्यात मालेगाव पोलीस ठाण्यात २०११ मध्ये दाखल गुन्ह्यातील दोषी निर्मलाबाई अशोक पवार ( रा. टोणगाव ता. भडगाव ) या महिलेला मालेगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना शासनाच्या आदेशान्वये कोरोना प्रादुर्भावमुळे कैद्यांची ४ जुन २०२२ पर्यंत रजेवर तात्पुरती मुक्तता करण्यात आली होती त्या या महिलेचाही समावेश होता
. दरम्यान, दिलेल्या रजेच्या मुदतीत ही महिला आरोपी नाशिक कारागृहात हजर न झाल्याने तिला फरार घोषीत करण्यात आले. ती तिच्या गावात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तिला गावातून ११ जुलै रोजी सकाळी ९ अटक केली
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, किशोर राठोड, पो.कॉ. विनोद सुभाष, महिला पोहेकॉ रत्ना मराठे, उपाली खरे, चालक पोहेकॉ राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.