पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव व संजीवनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलैच्या “डॉक्टर दिनानिमित्त” ७ जुलैरोजी संजीवनी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर उत्साहात झाले. या शिबिरात 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराला जळगाव येथील रेड प्लस ब्लड बँकेचे आणि संजीवनी हॉस्पिटलचे संचालक तथा रोटरीचे सहसचिव डॉ पवन पाटील यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात 23 रोटरी सदस्य आणि इतर 11 अशा 34 सदस्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष रो. डॉ. अमोल जाधव, सचिव रो.डॉ गोरख महाजन, रो.चंद्रकांत लोढाया , रो.राजेश मोर , रो. प्रदीप पाटील , रो. रुपेश शिंदे , रो. शैलेश खंडेलवाल , रो.डॉ. बाळकृष्ण पाटील , रो.डॉ. वैभव सूर्यवंशी, रो. शिवाजी शिंदे, रो.पंकज शिंदे, सौ ज्योती शिंदे, रो. निलेश कोटेच्या, रो.डॉ. नरेश गवंदे, रो. डॉ मुकेश तेली, रो.डॉ ऋषिकेश चौधरी, रो.डॉ सिद्धांत तेली, रो. डॉ अतुल पाटील, रो. रावसाहेब बोरसे, रो.डॉ कुणाल पाटील , रो. डॉक्टर सचिन पाटील, रो.सचिन बोरसे, रो.डॉ निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.