अमळनेर ;- शहरातील सामाजिक कार्यकर्ते व लाड शाखीय वाणी पंच मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील भामरे यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
दरवर्षी मित्रमंडळींना सुनील भामरे यांच्या कडून वाढदिवसा निमित्ताने अल्पोपहार केलाच जातो.पण यावर्षी मित्रमंडळी भेटण्यास येणं म्हणजे धोकादायकच म्हणून अल्पोपहार दयायचाच पण कोणाला ? असा विचार समोर आला असता अचानक कोरोनाशी दोन दोन हात करणारे आणि आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांसोबत या वर्षी वाढदिवस साजरा करावा अशी संकल्पना समोर आली. मग कोणताच विचार न करता सुनील भामरेंनी पालिकेच्या घनट्या गाड्यांवरील सर्व सफाइ कामगारांना व ठिकठिकाणी आपले कर्तव्य बजाविणारे पोलीस कर्मचारी,महाराष्ट्र राज्य विदुत मडळचे कर्मचाऱ्यांना बोलावून सकाळी सर्वांना पार्सलद्वारे मिसळ पाव देऊन साजरा केला.