चोपडा ( प्रतिनिधी ) – अडावद येथे दुकानासमोर ठेवलेले ५० हजार रूपये किंमतीचे ९०० फुट केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आरोपीसीसीटीव्हीत कैद झाला आहे.
“नानाभाऊ निळकंठ महाजन (वय-५६ , रा. अडावद ता. चोपडा ) हे वायरमन आहेत . त्यांचे अडावद येथे ईलक्ट्रीक दुकान आहे. दुकानासमोर ९०० फूट केबल वायर ठेवलेली होती. गावातील अफसर हुसैन मिनयार याने ५ जुलै रोजी दुपारी ५० हजार रूपये किंमतीचे केबल वायर चोरून नेले. संशयित आरोपी केबल वायरची चोरी करतांना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नानाभाऊ महाजन यांनी अडावद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या तक्रारीवरून संशयित अफसर हुसैन मिनयार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संशयित अफसर हुसैन मिनयार याला अटक करण्यात आली पुढील तपास पो ना कैलास बाविस्कर करीत आहेत.