• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईत हत्या करून फरार झालेले जळगावचे दोन संशयित ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2022
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

गावठी कट्ट्याच्या गुन्ह्यात जामीन मिळताच एकाच्या जळगाव एलसीबीने मुसक्या आवळल्या !

जळगाव ( प्रतिनिधी ) – मुंबईत गावठी कट्ट्याने गोळी झाडत एकाची हत्या करून फरार झालेले जळगावचेच दोन संशयित सहाव्याच दिवशी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले . विशेष म्हणजे यापैकी एक आरोपी २ जुलै रोजी गावठी कट्टा बाळगल्याच्या आरोपावरून जळगाव कारागृहात होता . त्याला आज या गुन्ह्यात जामीन मिळताच जळगाव एलसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

जळगावचे प्रवीण शिंदे आणि सागर मराठे साकीनाका ( मुंबई ) येथील हॉटेल कोकण किनारा येथे वेटर म्हणून कामाला होते . संदीप सरवणकर आणि प्रफुल्ल पवार हे दोघे हे हॉटेल भागीदारीत चालवत होते . प्रफुल्ल पवार हे बांद्रा पश्चिम येथे राहतात . या दोघांमध्ये पैशांचा वाद होता . प्रफुल्ल पवार याने संदीप सरवणकरकडे पैशांसाठी तगादा लावलेला होता . हा वाद विकोपाला गेल्याने संदीप सरवणकरने प्रवीण शिंदेला २० हजारात प्रफुल्ल पवारच्या हत्येची सुपारी दिली होती . या हत्येच्या नियोजनानुसार प्रवीण शिंदे याने १ जुलै रोजीच्या मध्यरात्री प्रफुल्ल पवार यांच्या स्कॉर्पिओ गाडीतच गावठी कट्ट्यातून डोक्यात गोळी झाडत प्रफुल्ल पवारांची हत्या केली होती , अशी कबुली त्याने पोलिसांना दिली असल्याचे समजते . त्यांनतर प्रवीण शिंदे , संदीप सरवणकर आणि सागर मराठे यांनी प्रफुल्ल पवारचा मृतदेह घटनास्थळापासून स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खिरडी आऊटपोस्टच्या हद्दीत महामार्गावर गाडी आणून उभी केली. दरम्यानच्या प्रवासात संदीप सरवणकर गाडीतून उतरून पसार झाला . ही गाडी लांब कुठेतरी उभी करून द्या आणि तुम्ही जळगावकडे निघून जा असे या दोन्ही संशयितांना संदीप सरवणकरने सांगितले होते . ते दोघे इगतपुरीमार्गे जळगावला आले होते .

ही स्कॉर्पिओ गाडी ३ जुलै रोजी बेवारस स्थितीत उभी असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना समजल्यावर त्यांनी गाडीची तपासणी केली तेंव्हा पोलिसांना गाडीत हा मृतदेह आढळला होता .मृतदेहाची ओळख पटवत कुटुंबियांना माहिती देऊन अन्य धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न सुरु केला होता . हॉटेलमधील व प्रवासातील महामार्गावरील टोल नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेजवरून ठाणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता . अखेरचा कॉल प्रफुल्ल पवारांच्या मोबाईल मधून संदीप सरवणकर यांनाच केला गेलेला असल्याने पोलिसांच्या संशयाची सुई संदीप सरवणकरवरच होती . त्याच्या घरी चौकशी केल्यावर तो फरार असल्याचे निष्पन्न झाले .

तपासाच्या पुढच्या टप्प्यात ठाणे ग्रामीण पोलिसांचे पथक जळगावला येण्यासाठी निघाले होते . दरम्यान जळगावात हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या प्रविण विनोद शिंदे (वय-२१ ) याला २ जुलै रोजी पोलीसांनी अटक केली होती या गुन्ह्यात आज ( ६ जुलै ) प्रवीण शिंदेला जामीन मिळाला होता जामीन मिळाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर येताच त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना संशयित मुंबईत कुणाचातरी खून करून आलेला असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून .मिळालेली होती .

आज ( ६ जुलै ) सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान ठाणे ग्रामीण पोलिसांचे पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात येऊन धडकले . त्यांनी दिलेली माहिती आणि जळगावातील गुन्हे शाखेत चौकशीत या संशयिताने दिलेल्या माहितीवरून त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिल्याचे समजते . त्याचा दुसरा साथीदार सागर मराठे याला त्याच्या राहत्या घरातून जळगावची स्थानिक गुन्हे शाखा आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पकडले . या संशयितांना सोबत घेऊन ठाणे ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे .

या कारवाईत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना विजय पाटील , प्रीतम पाटील , पो कॉ पंकज शिंदे , सचिन महाजन यांच्यासह ठाणे ग्रामीण पोलिसांच्या पथकातील स पो नि नितीन खैरनार , पो उ नि बडीव , पो हे कॉ पाटील , साहिल , सुर्वे , बोडखे हे सहभागी झाले होते .


 

 

Previous Post

कत्तलीसाठी गुरे नेणाऱ्या दोन जणांना अटक

Next Post

नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव बसने मोटारसायकलस्वाराला उडवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव बसने मोटारसायकलस्वाराला उडवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon