जळगाव ( प्रतिनिधी ) – निर्दयतेने वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या दोन गुरांची वाहतूक करतांना पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट येथे सुटका करण्यात आली पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
पिंप्राळा भागातील सोमाणी मार्केट जवळून दोन गुरांना वाहनात निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनिय माहिती रामानंदनगर पोलीसांना मिळाली पो नि विजय शिंदे यांच्या सुचनेनुसार पोलीसांनी ५ जुलै रोजी दुपारी सोमाणी मार्केटजवळ वाहनाची तपासणी केली २६ हजार रूपये किंमतीच्या दोन गुरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले. संजय माणिक धनगर (वय-४४ , रा. मालोद ता. यावल ) आणि परशूराम पंडीत पाटील (वय-३३ , रा. किनगाव ता. यावल ) यांना ताब्यात घेतले दोन्ही गुरांची सुटका करण्यात आली रात्री पोलीस कर्मचारी सागरकुमार देवरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना राजेश चव्हाण करीत आहेत.