जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगर हुडको येथील विवाहितेला माहेरहुन कर्ज फेडण्यासाठी दीड लाख रुपये आणावे, यासाठी पतीकडून छळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजीनगर दालमील परिसरातील माहेर असलेल्या रुबीनाबी शोएब शेख (वय-२२) यांचा विवाह शिवाजीनगर हुडको येथील शोएब जावेद शेख यांच्याशी झालेला आहे. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती शोएब शेख याने पत्नीला माहेरीहून कर्ज फेडण्यासाठी दीड लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. विवाहितेच्या आईची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैसे आणले नाही, याचा राग धरून घरातील काम जमत नाही असे सांगून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला विरोध केला असता विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. ५ जुलैरोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून पती शोयब जावेद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना करुणा सागर करीत आहेत.