जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद जवळच्या तिघ्ने गावात धाड टाकून आज स्थानिक गुन्हे शाखेने एक कोटीचा गांजा पकडला ! एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आज ( दि – ५) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, तिघ्ने ( ता – भुसावळ ) येथे मनोज रोहीदास जाधव हा त्याचे घरात गांजा कब्जात बाळगुन चोरटी विक्री करीत आहे. पो नि किरणकुमार बकाले यांनी पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधीकारी सोमनाथ वाघ चौरे यांचे मार्गदर्शन घेवुन नशिराबादला येऊन छापा टाकण्यासाठी नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांच्याकडुन शासकीय पंच मिळवले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व नशिराबादचे प्रभारी सपोनि अनिल मोरे यांच्यासह तिघ्ने गांवात छापा टाकला मनोज जाधव याच्या घराचे मागच्या खोलीत हा गांजा सुमारे ८८५ किलो साठवलेला आढळला . त्याची किमत अंदाजे १,०६,२०,०००/- रुपये (एक कोटी सहा लाख विस हजार) आहे . हा गांजा जागीच जप्त करण्यात आला . या धाडीत राहुल काशिनाथ सुर्यवंशी ( वय २५ रा. वाडीशेवाडा ता पाचोरा ) यास ताब्यात घेण्यात आले .
ही कारवाई पो नि किरणकुमार बकाले, सपोनि जालींदर पळे, पोउनि अमोल देवढे, स फौ युनुस शेख , सफो वसंत लिंगायत, सफी रवि नरवाडे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दिपक पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे ,पोना नंदलाल पाटील, पोना विजय पाटील, पोना भगवान पाटील, पोना नितीन बाविस्कर, पोना प्रमोद लाडवंजारी, पोकों ईश्वर पाटील, पोकॉ लोकेश माळी, सफी रमेश जाधव, विजय चौधरी, पोना दर्शन ढाकणे,
नशिराबादचे सपोनि अनिल मोरे, पोउनि राजेंद्रं साळुंखे, पोहेकॉ गजानन देशमुख, पोना किरण बाविस्कर, पोना रविद्रं इंधाटे, पोना सुधिर विसपुते पोना समाधान पाटील पोकॉ विजय अहीरे, पोकों दिनेश भोई यांनी केली.