पहूर ( प्रतिनिधी ) – इंस्टाग्रामवर मुलीच्या नावाचे बनावट खाते तयार करीत अश्लील मॅसेज आणि मुलींचे फोटो अपलोड करून विनयभंग करणाऱ्या आरोपीवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे १६ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्या मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून संशयित आरोपी रिहान मुनाफ पांडे ( रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव ) याने अश्लिल मॅसेज केले. नंतर गावातीलच इतर तीन मुलींसोबतचा फोटो अपलोड करीत बदनामी करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी रिहान मुनाफ पांडे विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो नि प्रताप इंगळे करीत आहेत .