जळगाव ( प्रतिनिधी ) – बळीरामपेठेतील दुर्गादेवी चौकात घरगुती गॅसचा काळाबाजार करुन वाहनांमध्ये बेकायदेशीर गॅस भरुन देणाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत ४ लाख १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
बळीरामपेठेत गंगूबाई शाळेसमोर दुर्गा देवी चौकात अनधिकृतपणे काही जण वाहनांमध्ये घरगुती गॅस भरुन देत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना मिळाली. त्यांनी स पो नि राहूल फुला यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने सोमवारी सायंकाळी घटनास्थळ गाठले. याठिकाणी १२ जण घरगुती गॅस रिक्षात तसेच चारचाकी वाहनांमध्ये भरतांना रंगेहाथ सापडले. पथकाने कारवाई करुन गॅस भरण्याचे मशीन, सिलिंडर तसेच इतर साहित्य असा ४ लाख १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स पो नि राहूल फुला यांच्या फिर्यादीवरुन नाजिक खान नईम खान पठाण, फिरोज खान सलीम खान , अब्दुल रज्जाक रंगरेज, शेख सोनू एजाज, प्रकाश लक्ष्मण वारुळे, दिपक घनशाम पाटील, गणेश काशिनाथ गोवे, महादू शंकर तेलंग, दिलीप ओंकार सोनवणे, सिकंदर शब्बीर शेख, विजय देवराम सोनवणे व जितेंद्र वसंत चौधरी या १२ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना विजय निकुंभ करीत आहेत.