जळगाव ( प्रतिनिधी ) – पूर्ववैमनस्यातून पिंप्राळा येथील तरूणाला मोटारसायकलवर शेतात नेवून पाच जणांनी बेदम मारहाण करीत गंभीर दुखापत केली रामानंदनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
अजय मनोज अहिरे (वय-१९) हा भवानी मंदीराजवळ, पिंप्राळा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ४ जुलैरोजी दुपारी अजय अहिरे मोटारसायकलने मु.जे. महाविद्यालयाच्या गेटसमोरून जात असतांना गोलू ठाकूर, निशांत चौधरी यांनी त्याला अडवले विनाकारण खाली ओढले. गोलू ठाकूर ( रा. तुकाराम वाडी ) , निशांत चौधरी, प्रेम मिस्तरी, यश शंकपाळे आणि तेजस ( सर्व रा. डीएनसी कॉलेज ) यांनी बेदम मारहाण केली. सर्वांनी मिळून अजयला मोटारसायकलवर जबरदस्ती बसवून आसोदा रोडवरील एका शेतात नेवून तेथेही पाचही जणांनी बेदम मारहाण केली. अजयने गंभीर जखमीवस्थेत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या तक्रारीवरून रात्री संशयित आरोपी गोलू ठाकूर , निशांत चौधरी, प्रेम मिस्तरी, यश शंकपाळे आणि तेजस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि गोपाल देशमुख करीत आहेत .