एरंडोल ( प्रतिनिधी ) – उत्राण येथील ७३ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष माधवराव कोळी (वय-७३) असे मृत वृध्दाचे नाव आहे.
संतोष कोळी हे उत्राण येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपुर्वी घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली हे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.