जळगाव ( प्रतिनिधी ) – घरावर विनाकारण दगडफेक केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना तांबापूरा येथील नाथवाडा परिसरात घडली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हमीदाबी शेख तस्लिम (वय – ४५) या दत्त मंदीराजवळ, नाथवाडा, तांबापूरा येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पिन्या (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह अनोखळी एक यांनी हमीदाबी घरात झोपेत असतांना घरावर दगडफेक केली. हमीदाबी व त्यांच्या मुलांनी बाहेर येवून पाहिल्यावर पिन्यासह अनोळखी एकजण दिसून आला. त्यांनी दगडफेक का करता असा जाब विचारल्याने तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशी धमकी दिली व पसार झाले. ३ जुलै रोजी दुपारी महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहेत.