जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे पोलीस जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३५ तक्रारींचा निपटारा करण्यात आला अशी माहिती, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली.
राज्यातील प्रत्येक पोलीस विभागीय क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करून नागरीकांच्या तक्रारी त्वरीत मार्गी लावाव्यात असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनीवारी जनता दरबारचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आले आहे. जळगाव पोलीस विभागातील जळगाव शहर, जिल्हापेठ, शनीपेठ, एमआयडीसी, रामानंद नगर पोलीस ठाणे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांसाठी २ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३५ तक्रारींचा निपटारा करण्यात आला अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली.
नागरीकांच्या कौटुंबिक, शेतीचा वाद, सामाईक भिंतचा वाद, शेतातच्या बांधावरील वाद देखील तातडीने सोडविण्याच्या सुचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.