जळगाव ( प्रतिनिधी ) – गोलाणी मार्केट समोरील पार्किंगमध्ये लावलेली सुतारकाम करणाऱ्या मजुराची १५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली २९ जून रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फकीरा शेख हुसेन (वय-५५ , रा. तरसोद रोड, नशिराबाद ) येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २७ जून रोजी दुपारी गोलाणी मार्केट येथे कामानिमित्त मोटारसायकल (एमएच १९ एन ६९६३) वरून आले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात २९ जून रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला पुढील तपास पो.ना. गजानन बडगुजर करीत आहेत.