जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील झुलेलाल वाटरपार्कच्या लॉकरमध्ये ठेवलेले २ मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
२८ जून रोजी दुपारी शेख परवेज शेख उस्मान (वय-२३ , रा. खडकारोड ग्रीन पार्क, भुसावळ ) हा मित्रांसोबत झुलेलाल वाटर पार्क येथे आला होता. त्यांनी एक लॉकर घेऊन दोन मोबाईल ठेवले होते. अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत लॉकरमध्ये ठेवलेले १६ हजार रुपये किमतीचे दोन्ही मोबाईल चोरून नेले. शेख परवेज याने परिसरात दोन्ही मोबाईलचा शोध घेतला मोबाईल कुठेही आढळून आलेले नाही. त्यांनी २९ जून रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ जितेंद्र राठोड करीत आहेत.