रावेर- २५ मार्चपासून लॉकडाऊन घोषित झाल्यावर मुंबई,पुणे,नाशिक,सुरत,अहमदाबाद या भागात नोकरीसाठी,कामधंद्यायासाठी गेलेले मजूर मूळ गावी पायी व सायकलीने जात आहे.अधिकतर मजूर उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,छत्तीसगढ,याभागातील असल्याने ते रावेरहून जात असतांना ठीकठिकाणी त्यांना जेवण,नाश्ता,चहा-पाणी पुरवण्याचे काम रावेरात अनेक हात करत आहे.कोरोना आपत्तीच्या काळात मदतीचा हात देण्याचे काम करणाऱ्या अनेक दानशूर लोकांचे कार्य वाखाण्याजोगे आहे.तसेच काम खानापूर (ता.रावेर) येथील पत्रकार व खानापूर येथील तंटा मुक्त समिती अध्यक्ष कुमार नरवाडे व मित्र परिवार यांचेकडून एका महिन्यापासून दरोरोज ४००/५०० लोकांना जेवण पुरवत आहे.आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून १५ हजार वाटकरूना अन्नदान केले आहे.
३० मार्च पासून महानगरातील माणसे घरी जाण्यासाठी,मिळेल त्या मार्गाने मूळ गावी जाण्यासाठी धडपडत आहे.पहिले लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंत होते.अनेकांनी १४ पर्यंत वाट पहिली मात्र लॉकडाऊन आणखी वाढल्याने आता मात्र उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशातील मजुरांनी सायकल किंवा पायीच घरी जाण्याचा सपाटा धरला आहे,तब्बल दीड हजार किमी अंतर पायी कापत असतांना रावेरमध्ये या वाटकरुनां माणुसकीचे दर्शन झाले,अनेक भागात नाश्ता पाणी आणि जेवण मिळाल्याने या लोकांनी नागरिकांचे आभार मानले.खानापूर येथे कुमार नरवाडे यांनी त्यांच्या बुऱ्हाणपूर रोड वरील “गांगलक्ष” टन काट्यावर सुमारे ४००/ ५०० लोकांना सकाळी नाश्ता,दुपारी जेवण थंड पाणी देवून त्यांची भूक क्षमवली जात आहे.आता पर्यंत महिन्यात १५००० लोकांना अन्नदान केले आहे.पायी येणाऱ्या लोकांना हात पाय धुण्यासाठी पाणी,सॅॅनीटायझर काही जण मुक्कामी थांबत असल्यास त्यांच्या झोपण्याची व आंघोळीची सोय देखील त्यांनी केली आहे.यासाठी गावातील नागरिक देखील सढळ हाताने गव्हू,तांदूळ अन्य वस्तू पाठवत आहे या कार्यात संजय महाजन, गणेश शेटी, माधव तेली, गिरीश धांडे, सुभाष माळी , संजय कोळी, अशोक फेगडे, मयुर तेली, जगन्नाथ महाजन,गौरव नरवाडे ,बाळू काठोके, प्रसाद धर्माधिकारी, भूषण पाटील, राजू शेख रशिद, कांन्हा भरते , बाळू भारंबे, सचिन भरते गोकुळ माळी, योगेश्वर महाजन, पवन शिवरामे , कांचन धांडे, हर्षल धांडे, अरविंद धांडे, अरविंद भरते, विनोद धांडे, सनी धांडे, बबलू तेली, संजय तेली भूषण राजपूत, रोहन धांडे, यांच्यासह
स्वामी विवेकानंद फाऊंडेशन चे पदाधिकारी , महिला बचत गटांच्या महिला तथा गावातील युवक वर्ग व मित्र परिवार परिश्रम घेत आहे .तर बुधवारी (दि.२९) रोजी अटवाडे सरपंच गणेश महाजन यांनी देखील यात खारीचा वाटा उचलला आहे.