जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली प्र.बो. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत चेअरमनपदी विजय निळकंठ काटोले व व्हाईस चेअरमनपदी समाधान चिंधू बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
५ जुनरोजी झालेल्या शिरसोली विकासोच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलला सर्व १३ जागा मिळाल्या आहेत आज ( १६ जून ) . सर्व १३ संचालक संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० वाजता झालेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठीच्या बैठकीत उपस्थित होते . यावेळी सर्वानुमते चेअरमनपदी विजय निळकंठ काटोले व व्हाईस चेअरमनपदी समाधान चिंधू बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिले . त्यांना संस्थेचे सचिव भालचंद्र वाणी यांनी सहकार्य केले . संचालक शेनफडू नामदेव पाटील , विजय रुपला बारी, सुभाष बारी , गोकुळ बारी , राजू लोटू बारी , ज्ञानेश्वर माळी , बाळू तुळशीराम पाटील, सुरेखा रामकृष्ण बारी, सकुबाई मिठाराम पाटील , उत्तम रघुनाथ बारी , रामकृष्ण दगडू नेटके हे संचालक या बैठकीत उपस्थित होते शिरसोली विकासोच्या चेअरमनपदी विजय काटोले व व्हाईस चेअरमनपदी समाधान बोबडे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे