जळगाव ( प्रतिनिधी ) – वाघनगर परिसरातील गुरूकृपा कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून रोकड व दागिने असा ७३ हजाराचां मुद्देमाल चोरून नेला आहे. ११ जून रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निलेश अशोक किरंगे (वय – ३१) हे . गुरूकृपा कॉलनीत वास्तव्याला आहेत . ८ जून रोजी रात्रीपासून ते १० जून रेाजी रात्री दरम्यान त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी संधीचा फायदा घेत मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून लोखंडी कपाटातून दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चैन आणि चांदीच्या साखळ्या असा ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. निलेश किरंगे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ११ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ सतिष हारनोळ करीत आहेत .