नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – सध्याच्या वाहतूक नियमांनुसार, कोणत्याही मोटार वाहन चालकाने आपत्कालीन वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. मार्गावर एखादे आपत्कालीन वाहन दिसले, जे तुमच्या मागे आहे, त्याला ताबडतोब ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता द्यावा. असे न झाल्यास चलान कापले जाऊ शकते. १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका अशा आपत्कालीन वाहनांना मार्ग देणे बंधनकारक आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ अंतर्गत, वाहनचालकांना आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. सुधारित एमव्ही कायद्याच्या कलम १९४ (इ) अंतर्गत चलान कापले जाते.








