जळगाव ( प्रतिनिधी ) – रामेश्वर कॉलनीत लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान मंदीराजवळ तरूण हातात लोखंडी सुरा घेवून फिरत असल्याची माहिती पो नि प्रताप शिकारे यांना मिळाली. ८ जून रोजी सायंकाळी पोलीसांनी कारवाई करत संशयित राकेश कैलास सपकाळे (वय-१९) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६ इंच लांबीचा लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला पोकॉ गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित राकेश सपकाळे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स फौ आनंदसिंग पाटील, पो ना गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी ही कारवाई केली.