पारोळा ( प्रतिनिधी ) – दरोड्याच्या तयारीत असणार्या टोळीतील तिघांना आधीच पोलिसांनी अटक केल्याने त्यांचा डाव उधळला गेला .
पारोळा पोलिसांना ल्डन बियर शॉपीजवळ अंधारात पाच संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पो नि रामदास वाकोडे यांनी सापळा रचून तीन दरोडेखोरांना अटक केली. भूषण धनराज पाटील, प्रशांत नाना पाटील आणि ज्ञानेश्वर वसंत पाटील या तिघांना ताब्यात घेण्यात आले. दोन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
पोलिसांनी भूषण पाटील याच्याकडून चाकू व मिरचीपूड; प्रशांत पाटील याच्याकडून दोर व ज्ञानेश्वर पाटील याच्याकडून टॉर्च व स्टम्प जप्त केला. सुनील पाटील व विजय चौधरी पसार झाले त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पो नि रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.