यावल ( प्रतिनिधी ) – किनगाव येथील सरकारी दवाखान्याजवळून तरूणाची मोटारसायकल चोरांनी चोरून नेली यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
उमेश सुरेश बाविस्कर (वय-३०) हे पुनगाव ( ता. चोपडा ) येथे राहतात मजूरी करत असल्याने काम मिळेल त्या गावी जावून काम करतो. यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीडी ३४१७) क्रमांकाची मोटारसायकल आहे. २४ मेरोजी संध्याकाळी उमेश बाविस्कर यावल तालुक्यातील किनगाव येथे आला. सरकारी दवाखान्याजवळ त्याने मोटारसायकल पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेली. ३० मे रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहेत








