जळगाव ( प्रतिनिधी ) – अयोध्यानगर भागातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अयोध्या नगर भागातून (एमएच 19 झेड 5248) या क्रमांकाच्या डंपरमधून वाळूची चोरटी वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली, त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, दिपक चौधरी, सचिन मुंढे, यांच्या पथकाने सोमवारी अयोध्यानगर परिसरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चालकाला वाळु वाहतुकीचा परवाना विचारला असता, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने डंपरवरील चालक पवन शिवलाल सोनवणे ( वय २१ रा.बांभोरी ता.धरणगाव ) यास ताब्यात घेतले असून डंपर मुकेश उत्तम साळुंखे ( रा. बांभोरी प्र.चा. ता.धरणगाव) यांच्या मालकीचे असल्याची कबूली चालकाने दिली आहे. डंपरसह ६ हजार रुपये किंमतीची वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. पो कॉ चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.