जळगाव ( प्रतिनिधी ) – म.रा.काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य कर्मचारी संघटनेची सभा दिनांक १३ मे २०२२ रोजी आयोजीत करण्यात आली. सदरहु सभेमध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद गट क, कर्मचारी यांची सर्वसाधारण बदली प्रक्रीया अतिशय शिस्तबध्द पध्दतीने आणि पारदर्शकपणे राबवीण्यात आली.
या करीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बि के मोहन, आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुढचे पवार मॅडम यांचे व संपूर्ण प्रशासनाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, जि.प. जळगाव, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे, प्रशासन अधिकारी डॉ मनोहर बावणे, सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेशजी झोपे, कार्यालयीन अधिक्षक अरुण बागुल, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र सोनवणे आणि कार्यालयातील सर्व कर्मचारी यांचे देखिल संघटनाअध्यक्ष यांनी आभार मानले.
त्यानंतर शिवाजी गुरगुळे, आरोग्य पर्यवेक्षक, पंचायत समिती एरंडोल, यांची जिल्हा अतिरिक्त सचिव पदावर आणि कैलास गणपत राठोड यांची जिल्हा उपाध्यक्ष तसेच दिपक दिक्षित यांची कार्यकारणी सदस्य पदावर पुढील वर्षाच्या कालावधीकरीता निवड करण्यात आली व तसा ठराव घेण्यात आला. यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, आर. एस. अडकमोल, केंद्रीय अध्यक्ष संजय ठाकुर, जिल्हाध्यक्ष सुनिल निकम, राज्य उपाध्यक्ष विजया पाटील जिल्हा कोषाध्यक्षा, मिलींद लोणारी जिल्हा सरचिटणीस, पि.टी. कोळी तालुका सचिव, संजय बाबीस्कर तालुका अध्यक्ष, ईत्यादी पदाधिकारींच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ आणि निवड आदेश देवून स्वागत सत्कार करण्यात आला.