अमळनेर ( प्रतिनिधी ) – रेडीमेड गारमेंटची फ्रँजाईजी देण्याच्या नावाखाली महिलेची सात लाख रूपयांमध्ये फसवणूक करण्यात आली पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगाव खुर्द येथील रेखा नारायण शिंपी यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेनिम हब लाइफ स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड या रेडिमेड गारमेंट्स विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना फ्रँचायसी हवी होती. त्यांनी परमेश पाटील (रा. काकागुडा सिकंदराबाद), नामदेव शिंपी (रा. दादावाडी, जळगाव), योगेश कुलकर्णी (रा. रामानंद नगर, जळगाव), नरेंद्र पवार (रा. भुसावळ), साईनाथ पाटील (रा. कापरा, सिकंदराबाद) यांच्याशी संपर्क साधला. या संशयितांनी रेखा शिंपी यांच्याशी कंपनीची फ्रेंचाईची घेण्यासंदर्भात १९ जुलै २०१९ रोजी करार केला होता. त्यांच्याकडून ७ लाख रुपये घेऊन धुळे येथे शोरूमसाठी दुकानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्यानुसार रेखा शिंपी यांनी धुळे येथील वाडी भोकर रोडला दुकान घेऊन त्याचे भाडे ठरवले. मात्र, काही दिवसांनी माल देणे बंद केले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर रेखा शिंपी यांनी अनामत रक्कम परत मागितली असता योगेश कुलकर्णी यांनी नोटरी करून अनामत परत करेपर्यंत दरमहा २० हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, आजपर्यंत काहीच न दिल्याने रेखा शिंपी यांनी अमळनेर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून परमेश पाटील, नामदेव शिंपी, योगेश कुलकर्णी, नरेंद्र पवार, साईनाथ पाटील या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.