जळगाव ( प्रतिनिधी ) – सावखेडा शिवारातून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी पकडले व एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावखेडा शिवारातील बिबानगर परिसरातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पो नि रामकृष्ण कुंभार यांना मिळाली ५ मेरोजी दुपारी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यावेळी पो उ नि गणेश सायकर, पोहेकॉ लिलाधर महाजन, हरीलाल पाटील, संजय भालेराव, तुषार जोशी आणि अशोक महाजन यांनी कारवाई करत ट्रक्टर जप्त केले. पो ना विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अनिल सोनवणे (वय-४० ,रा. खेडी ता.जि.जळगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहेत.