जळगाव ( प्रतिनिधी ) – गेंदालाल मील परिसरातील एका घरातून १५ हजार रूपयांची रोकड लांबविली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मलाबाई जगन्नाथ महाजन (वय-४६) ह्या . गेंदालाल मिल भागात कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत . ३ मे रोजी रात्री घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा मुलगा सचिन महाजन यांची घरात टांगलेलय पॅन्टच्या खिशातून १४ हजार ८०० रूपयांची रोकड चोरून नेली. या महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ४ मे रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना योगेश पाटील करीत आहेत.