जळगाव ( प्रतिनिधी ) – गावठी पिस्तूल घेवून दहशत पसरविणारा आरोपी सुपड्याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याचे पिस्तूल हस्तगत केले आहे.
पिंप्राळा परिसरातील निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकूर (वय-२७ , रा. मढी चौक पिंप्राळा ) हातात गावठी पिस्तूल घेवून परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सपोनि जालिंदर पळे, पो.ना. प्रितमकुमार पाटील, विजय पाटील यांनी ४ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी सुपड्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून २० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत पो.ना. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत .