यावल ( प्रतिनिधी ) – भोरटेक गावाजवळ ट्रक व बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत आठ जण गंभीर जखमी झाले आहेत .
यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ २७ एप्रिलरोजी सकाळी रावेर आगाराची बस क्रमांक (एचएच ४० एन ९०६३) ही प्रवासी घेवून जळगावकडून रावेरला जात होती,फैजपूरकडून भुसावळकडे जाणारा ट्रक (युपी ८० सीटी ७५३६) जात असताना भोरटेक गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले . सर्व जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.