जळगाव ( प्रतिनिधी ) – काल मध्यरात्री दोन जणांनी विनाकारण शिवीगाळ करून घरावर दगडफेक करीत दोन मोटारसायकलीचे नुकसान केले रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नलीनी विलास तायडे (वय-५०) गाडगे बाबा चौक जळगाव येथे दोन मुले व सुनांसह वास्तव्याला आहे. मुले व सुना नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी बाहेरगावी गेले आहे. दरम्यान, २७ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास नलीनी तायडे घरी एकट्या असतांना आबा आणि आश्विन (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह इतर तीन जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली त्यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या दोन मोटारसायकलींची तोडफोड केली. नलीनी तायडे यांचे दोन्ही मुले विनोद आणि सतिश यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पहाटे ३ वाजता रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आबा व आश्विन यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.