पारोळा ( प्रतिनिधी ) – आपल्या आईच्या संदर्भाने एका वृद्धाला ओळख दाखवत लग्नाच्या गप्पांमध्ये भुलवून वृद्धाची अंगठी घेऊन गायब झालेला चोर पोलिसांनी पकडला आहे .
तालुक्यातील जोगलखेडे येथील विरभान पाटील ( वय 74 ) वर्ष यांना 10 एप्रिल रोजी पारोळा येथे नगरपालिकेजवळ एक संशयित भेटला . त्याने मी सखूबाईचा मुलगा आहे , माझे लग्न जुळले असून तुमचे हातातील अंगठी मला आवडली असून अशीच डिझाईनची अंगठी मला करायची आहे, तुमचे बोटातून काढुन मला अंगठी पाहू द्या असे म्हणाला . फिर्यादीने विश्वास ठेऊन हातातील अंगठी काढुन दिली. ‘ बाबा तुम्ही इथेच थांबा मी सोनाराला अंगठी दाखवून येतो असे म्हणून निघून गेलेला आरोपी परत आला नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वीरभान पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज वरून पारोळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथक जळगाव यांनी शोध घेतला संशयित आरोपी दिगांबर न्हावी ( वय 51 , रा हरिओमनागर जळगाव ) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून पारोळा पोलिसांचे ताब्यात दिले या आरोपीस अटक करून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर फसवणूक करून नेलेली सोन्याची 7 ग्रामची अंगठी आरोपीने त्याचे घरी लपून ठेवलेली दोन पंचासमक्ष काढुन दिल्यावर जप्त केली आहे.
फिर्यादीने त्यांची अंगठी ओळखून आनंद व्यक्त केला या आरोपीवर 16 गुन्हे दाखल असून पुन्हा पोलीस कोठडी घेतल्यावर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हा तपास पो नि रामदास वाकोडे , पो ना योगेश जाधव, सुनील साळुंखे, संदीप सातपुते, सुनील वानखेडे, पो कॉ भोला पाटील स पो नि यशवंत पाटील व बापू पाटील यांनी केला